पारगावातील माळी मळावस्तीत शसस्त्र दरोडा

वृद्ध दाम्पत्यावर हल्ला : पतीचा मृत्यू, तर पत्नी गंभीर

पारगाव शिंगवे – पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळी मळावस्तीमधील एका घरावर चोरट्याने दरोडा टाकला, तर झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये पतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, चोरट्यांनी या दरोड्यात रोख रक्कमेसह तीन तोळे सोने असा अंदाजे 90 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.
कुशाबा पिराजी लोखंडे (वय 85) असे मृत्यू झालेल्या वृद्ध पतीचे नाव आहे. तर सुमन कुशाबा लोखंडे (वय 75) या गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबतची माहिती अशी की, लोखंडे यांचे माळीमळा वस्तीत घर असून त्यांच्या मुलगा मुंबईत नोकरीला असल्याअने तो मुंबईतच राहतो. तर याठिकाणी लोखंडे दाम्पत्य राहते. दरम्यान, मध्यरात्री दीडच्या सुमारास लोखंडे यांच्या घराची पाठीमागील बाजूला असेलेले कवले उचकाटून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. कवले उचकटण्याच्या आवाजाने लोखंडे दाम्पत्याला जाग आल्याने त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्यात सुरूवात केली मात्र, चोरट्यांनी त्यांना जबर मारहाणीस सुरुवात केली. त्यातच चोरट्याने धारदार हत्याराने कुशाबा लोखंडे यांच्या मानेवर व छातीवर वार केले. तर सुमन लोखंडे यांच्या कपाळाखालील गालावर वार करुन हातवरही वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाट उचकाटून रोख रक्कम व तीन तोळे सोने असा 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तर जखमी अवस्थेतच सुमन यांनी यांनी शेजारी राहत असलेले दीर चंद्रकांत पिराजी लोखंडे यांना मोठ्या आरडाओरडा करुन आवाज दिला. त्यावेळी चंद्रकांत यांनी शेजारीवस्ती मधील नागरिकांना आवाज देऊन बोलवून घेतले. तर जखमी कुशाबा लोखंडे व सुमन लोखंडे यांना मंचर येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच कुशाबा लोंखडे यांचा मूत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तर सुमन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच परिसरातील पठारवस्ती मधील कांताराम ढोबळे यांच्या घराचा दरवाजा उघडून घरामधील पेटी उचकाटून साड्यांची चोरी केली तर तर तिसऱ्या ठिकाणी चोरट्याने कारवस्ती मधील सतेवान बाबुराव टाव्हरे यांच्या घरासमोरील मोटारसायकल (एम एच सीएच 2249) लंपास केली. घटनास्थळी अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक रविंद्र मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ, पोलीस नवनाथ नायकडे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी केली. तसेच तसेच ठसे पथकाने पाहाणी करून तपासणी केली तर श्‍वानपथकाने एक किलोमीटरपर्यंतचा माग घेतला. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.

  • पोलीस चौकीबाबत तातडीने निर्णय घेणार
    पारगाव येथे पोलीस चौकी बांधण्यात यावी यासाठी वारंवार पाठपुरवा सुरू असू पारगाव येथील जिल्हा परिषदेचे विश्रामगृह चौकीसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांना याबाबत सांगितल्यानंतर पोलीस चौकीबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)