पारगावातील अवैध दारुधंदे बंद करा -उपसरपंच

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील बेकायदेशीर दारू धंद्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून या परिसरातील बेकायदेशीर दारु धंदे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी गावच्या उपसरपंच सुनंदा ढोबळे यांनी केली आहे. दारू धंदे बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पारगाव परिसरात अनेक ठिकाणी अनेक बेकायदेशीर दारूविक्री सुरू असून याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमात मद्यपींचाच अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी हाणामारी, शिवीगाळ होत आहे; तसेच रस्त्यावर दारू पिऊन सुसाट वाहने चालवली जात आहेत. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. तरी तातडीने बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी उपसंरपच सुनंदा ढोबळे यांनी केली आहे. या दारुबंदीचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)