पारगावमध्ये स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

यवत- पारगाव (ता. दौंड) येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची 101 वी जयंती आज (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी देशाला दिलेले योगदान आणि बलिदान, तसेच त्यांचा कार्यकाळ आणि भाजप सरकारचा कार्यकाळ यामध्ये तफावत असून, भाजप सरकार हे जनहिताचे नसून जनसामान्यांसाठी हे जाचक सरकार आहे, अशी टीका कॉंग्रेस आयचे तालुका अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांनी केली. यावेळी माधुरी आल्हाट यांची दौंड तालुका युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पारगावचे उपसरपंच सोमनाथ ताकवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोमनाथ ताकवणे, अण्णासाहेब ताकवणे, रामचंद्र टिळेकर, माऊली शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी किसनराव जगदाळे, सुनील ताकवणे, अमोल बोत्रे, बाळासाहेब भोगावडे, किसनराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वासराव ताकवणे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)