पारगावच्या सरपंचपदी आशाताई ढोबळे

पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या आशाताई ढोबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती निवडणूक निर्णयक अधिकारी डी. एस. कोरपड यांनी दिली. सरपंचपदाची इतरांना संधी मिळावी यासाठी शांता चव्हाण यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार रिक्‍त झालेल्या जागेसाठी सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.
सरपंचपदासाठी आशाताई दत्तात्रय ढोबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार आशाताई ढोबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. नवनिर्वाचीत सरपंच ढोबळे यांचा सत्कार दूध संघाचे संचालक दौलत लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी ढोबळे, माजी सरपंच प्रज्ञा कुलकर्णी, उपसरंपच भाऊसाहेब ढोबळे, मारुती बढेकर, दत्तात्रय ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ग्रापंचायत सदस्य रामहारी पोंदे, सुनील भागवत, राधा लोखंडे, संगिता अस्वारे, मिनाक्षी पडघनकर तसेच किरण दातखिळे, विलास गांधी, रामकृष्ण पोंदे, बबन ढोबळे, योगेश राऊत, ग्रामसेवक आर. पी. भोये आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)