पारंपारिक शिक्का पुसण्याचा पारधी समाजाचा निर्धार

खटावला पारधी समाज बांधवांचा मेळावा

पुसेगाव, दि. 11 (वार्ताहर) – खटाव येथे आदिवासी दिनानिमित्त क्रांती दिनी झालेल्या पारधी समाज बांधवांच्या जाहीर मेळाव्यात शिकार, चोरी, मारामारी, गुन्हेगारी हे पारंपारिक शिक्के पुसण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी नवीन पिढीला शिक्षक्षित व संघटीत करण्याचा संकल्पही सर्वानुमते करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शास्त्रीनगर येथे झालेल्या मेळाव्यास जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप विधाते, आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष गणेश भोसले, मनोज देशमुख, प्रा. मेहबुब शेख, अनिल आवळे, संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा राणी शिंदे, काश्‍मिर शिंदे, अविनाश शिंदे, बापू शिंदे, उपदेश भोसले, सरोजिनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भोसले व शिंदे यांनी समाजाची आजपर्यंतची स्थिती, सध्या सुरू असलेले परिवर्तनाचे वारे, भविष्यकालीन प्रश्न, अडीअडचणी, संघटना बांधणी आदिंबाबत साधक-बाधक विचार मांडले. अनिल आवळे यांनी समाजातील आद्य क्रांतिवीर समशेरसिंग भोसले यांच्या जीवन चरित्राबद्दल थोडक्‍यात माहिती सांगितली. उपेक्षित समाज व दलितांना आजही म्हणावे तसे स्वातंत्र्य उपभोगता येत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रदीप विधाते यांनी भाषणात भटक्‍या पारधी समाजाला स्थिरता आणण्याच्या दृष्टीने खटाव गावाने चांगले सहकार्य केल्याचे सांगितले. तसेच पारधी समाज बांधवांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल व इतर भौतिक सुविधा देण्याचे अभिवचन दिले. प्रा. शेख, धनंजय क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात पारधी समाजाच्या उन्नतीसंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी अमिन आगा यांनी अपंग सेवा संघाच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. प्रारंभी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अक्षय भोसले यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष कैलास पवार, प्रा. नम्रता भोसले, शरद कदम, सुरज भांडवलकर, सनम शिंदे, गणेश भोसले, दया भोसले, नाना भोसले, नवनाथ शिंदे, हणमंत भोसले, किरण गायकवाड, संजय सावंत, विराज पवार, आदेश काळे, जालिंदर शिंदे, अशोक शिंदे, हाजिना काळे, सोनाली शिंदे, प्रियांका शिंदे, अमिशा भोसले, शालन शिंदे आदींसह पारधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)