पारंपरिक गाण्यांवर कोणाचाच हक्क नाही

गीतकार, संगीतकार आणि प्रकाशकाला उच्च न्यायालयाचा दिलासा


सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे


तूर्त आरोपपत्र दाखल न करण्याचे पोलिसांना आदेश

मुंबई – लग्न आणि समारंभात तसेच पार्टी अथवा ऑर्केस्ट्रामध्ये पारंपरीक गाणी गायली जातात. यामुळे या गाण्यांवर कोणीही हक्क सांगू शकत नाही, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने गीतकार, संगीतकार आणि प्रकाशकाला मोठा दिलासा दिला. कॉपीराईटचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करू नका, असा आदेशच न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

लग्न समारंभात पारंपरिक गाणी गायली आणि पुस्तक रूपानी प्रकाशीत केली म्हणून गीतकार प्रमोद सूर्या आणि प्रकाशक पुखराज सूर्या आणि हितेन पटेल यांच्या विरोधात डिसेंबर 2014 मध्ये मालाड पोलीस ठाण्यात आशादेवी सोनीगाडा यांनी तक्रार दाखल केली. आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून प्रमोद सूर्या आणि प्रकाशक पुखराज सूर्या आणि हितेन पटेल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. कॉपीराईटचा भंग कसा होउ शकतो, असा सवाल उपस्थित केला. कोणी वंदे मातरम्‌ अथवा राष्ट्रगीत प्रकाशित केले तर त्यावर कॉपीराईटचा भंग होईल का, अशा शब्दांत सरकारच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले. जुनी पारंपरिक गाणी नव्याने प्रदर्शित करणे अथवा ती संग्रहित ठेवल्यामुळे कॉपीराईटचे उल्लंघन होते की नाही, त्याबाबत आम्ही योग्य तो निर्णय देऊ. तोपर्यंत त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करू नका, असा आदेश पोलिसांना देत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)