पाय दुखावला तरी आलिया पिझ्झा पार्टीमध्ये 

आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एका खूप उंच इमारतीवर हे दोघे जण रेलिंगवर चढले आहेत. त्या उंचीवर दोघेही काही खतरनाक कसरत करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ रणबीर आणि आलियाच्या आगामी “ब्रह्मास्त्र’ मधील असल्याचे समजते आहे. याच सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यान आलिया भटच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली आहे.

-Ads-

तरी तिने आपल्या कामावर परिणाम होऊ दिलेला नाही. एकीकडे ती रणबीर कपूर बरोबर “ब्रह्मास्त्र’ मध्ये काम करते आहे, तर दुसरीकडे करण जोहरच्या “कलंक’च्या अखेरच्या शेड्युलचे शुटिंगही ती करते आहे. दोनच दिवसांपूर्वी करण जोहरने दिलेल्या पिझ्झा पार्टीमध्येही ती आली होती. तिला नीट चालताही येत नव्हते. क्रंचचा आधार घेऊन ती चालत होती. फोटोग्राफर्स समोर आल्यावर तिने आपल्या डाव्या पायावर बांधलेली पट्टीही दाखवली. तिला कामावर एवढे प्रेम आहे हे तिने पुन्हा एकदा दाखवून दिले. पण तिच्यावर किती प्रेम आहे हे रणबीरनेही दाखवून दिले आहे. पार्टीमध्ये पाय दुखावलेल्या आलियाला तो अजिबात एकटे सोडत नव्हता. तिला डॉक्‍टरांकडेही तोच घेऊन गेला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)