पायी चालणाऱ्यास दुधावर घसघशीत सूट!

  • व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम : नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी प्रयत्न

सोमाटणे (वार्ताहर) – सोमाटणे येथील दुग्ध व्यावसायिकाने नागरिकांच्या आरोग्य विषयी एक आगळी वेगळी संकल्पना राबवली. सकाळी पायी डेअरीमध्ये येईल, त्या ग्राहकाला चालू भावात लिटर मागे पाच रुपयांची घसघशीत सूट मिळणार आहे. हा अभिनव उपक्रम येथील संतोष हिरामण मुऱ्हे यांनी आपल्या दूध डेअरीत राबवला आहे. व्यवसायाबरोबरच त्यांना सामाजिकतेची आवड आहे. याच जाणीवेतून त्यांनी हर नवीन योजना आखली.

मावळ तालुक्‍यात सध्या जमिनीचे भाव वाढल्याने लोकांच्या हातात मुबलक पैसा येवू लागला आहे. तसेच या परिसरात उद्योगधंदे व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रत्येकजण आपल्या व्यवसायात व कामात व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढतच चाललेय आहेत. उत्तम आयोग्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय असल्याने लोकांमध्ये चालण्याची गोडी निर्माण व्हावी व आपले आरोग्य उत्तम राखावे तसेच लवकर उठण्याची सवय लागावी याकरिता ही योजना राबविण्यात येत असल्याचे मुऱ्हे यांनी सांगितले.

तुम्हाला काय फायदा असे विचारले असता ते म्हणाले की, जर दूध घेण्यासाठी सकाळी चालत आलात तर आपोआपच व्यायाम होईल, त्यामुळे शारीरिक तक्रारी कमी होतील व बरेचसे आजार देखील कमी होतील. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात मिळणारा आनंद हा माझ्या नफ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असेल, असे मुऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, संतोष मुऱ्हे हे सतत काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवत असतात. त्यांनी यापूर्वीही जास्तीत जास्त पैलवान तयार व्हावेत यासाठी मूळ किमतीमध्ये दूध तालमीतील तयारी करत असलेल्या विद्यार्थी दशेतील पैलवानांना उपलब्ध करून दिले.

आळस झटकण्याचा प्रयत्न…
धक्‍काधकीच्या जीवनात आळशी वृत्ती वाढत चालली आहे. हा आळस घालवायचा असेल, तर अशा योजना परिणामकारक ठरतील. लोकांनी पैसे वाचवण्यासाठी का होईना; परंतु पायी चालत आले पाहिजे, तरच या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना फक्‍त रोज सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असणार असून, घरगुती वापरासाठी किरकोळ ग्राहकांसाठीच असणार आहेत. आरोग्य सुधारावे हाच या योजनेमागचा उद्देश असल्याचे मुऱ्हे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)