नवी दिल्ली: जुलै महिन्यात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता 6.6 टक्‍क्‍यानी वाढली आहे. जून महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता 7.6 टक्‍क्‍यानी वाढली होती. त्यामुळे या क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. कोळसा, तेल शुद्धीकरण, सिमेंट आणि खताचे उत्पादन वाढल्यामुळे या संपूर्ण क्षेत्राची उत्पादकता काही प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते. मात्र अजूही क्रुड तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढलेले नाही. त्याचबरोबर पोलादाचे उत्पादन केवळ 6 टक्‍क्‍यानी वाढले आहे.

एप्रिल ते जून या काळात पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता बऱ्यापैकी म्हणजे 5.8 टक्‍क्‍यानी वाढली आहे. गेल्या वर्षी या काळात या क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.6 टक्‍क्‍यानी वाढली होती. त्यामुळे आता या वर्षाचा विकास दर वाढण्याची शक्‍यता वाढली असल्याचे विश्‍लेषकांना वाटते. या आधीच्या वर्षातल्या जुलैशी तुलना करता कोळसा उत्पादनात या वर्षाच्या जुलैमध्ये 9.7 टक्‍के वाढ झाली तर कच्च्या तेलाच्या उत्पादनात गेल्या जुलै महिन्याशी तुलना करता या जुलै महिन्यात 5.4 टक्के घट झाली. नैसर्गिक वायू उत्पादनातही या जुलैमध्ये 5.2 टक्‍क्‍यांनी घट झाली.

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याशी तुलना करता या जुलै महिन्यात पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात 12.3 टक्‍के वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षीच्या जुलैपेक्षा 2018 च्या जुलै महिन्यात खत उत्पादन 1.3 टक्‍के वाढले तर पोलाद उत्पादन 6 टक्‍के वाढले. गेल्या जुलैशी तुलना करता या वर्षीच्या जुलैमध्ये सिमेंट उत्पादनात 10.8 टक्‍के वाढीची नोंद झाली तर वीज उत्पादनात 4.8 टक्‍के वाढ दर्शवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)