पायाभूत सुविधांसाठीची प्रकल्प संख्या वाढणार

संग्रहित छायाचित्र

मुंबई – आगामी काळात सरकार पायाभूत सुविधावर भर देणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रकल्पांची संख्या वाढणार असल्याचे एपिरॉक मायनिंग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जेरी अँडरसन यांनी सांगीतले.
ते म्हणाले की, पायाभूत सुविधांचा विस्तार झाल्याशिवाय विकासदर दीर्घ पल्ल्यात वाढणार नाही. अगोदर ऍटलास कॉपकोचा भाग असलेली एपिरॉक आता नवा ब्रॅंड म्हणून काम करणार आहे. ते म्हणाले की, नवी कंपनी ग्राहकांना खाणकाम, पायाभूत सुविधा व नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील उत्पादने व सेवा देणार आहे.

ऍटलास कॉपको व एपिरॉक यांचे व्यवसायाचे मार्ग भिन्न असतील, ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांचा नावीन्य व बांधिलकीचा वारसा एकच असेल. कंपनी भारतातील खाणकाम क्षेत्राला नावीन्यपूर्ण अत्यंत उत्पादक उपकरणे देणार आहे. आम्ही नव्या बिझनेस एंटिटी विषयी आनंदी असून खाणकाम व सिव्हिल इंजिनीअरिंग उपकरणे या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी उत्सुक आहोत. त्यामुळे आमच्या ग्राहकांना उत्पादकता, ऊर्जाक्षमता व सुरक्षितता यामध्ये वाढ करण्यासाठी मदत होईल. एपिरॉकचे कारखाने नाशिक व हैदराबाद येथे आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)