पायाभूत सविधामुळे पोलाद उद्योगात भरीव वाढ होणार

मुंबई -पोलादावर प्रक्रिया करणाऱ्या फॉन्ड्री उद्योगात 2020 पर्यंत 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊन 25 लाखांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होईल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धातू परिषदेत व्यक्त करण्यात आली. पायाभूत सुविधा क्षेत्रांकडून लोखंडी वस्तुंची मागणी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्राला बरेच काम मिळणार आहे. त्यामुळे फॉन्ड्री व कास्टिंग उद्योगातील उत्पादनांची निर्यात 7 टक्के वाढत आहे. यामुळे फॉन्ड्री उद्योगातील भारताचा वाटा 3 वरून 6 टक्‍क्‍यांवर जाईल, असा विश्‍वास केंद्र सरकारच्या हिंदुस्थान इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अवजित घोष यांनी व्यक्त केला.

येथील बॉम्बे एक्‍झिबीशन सेंटरमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय धातू परिषद झाली. त्यातील चर्चांमध्ये फॉन्ड्री उद्योगाचा प्रामुख्याने उल्लेख होता. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. रस्त्यांची कामे जोमाने सुरू आहेत. एचएएल, बीडीएलसारख्या संरक्षण उत्पादन कंपन्यांचा विस्तार होत आहे. यातूनच फॉन्ड्री उत्पादन पुढील तीन ते चार वर्षात 11 पट वाढणार आहे. सध्या वार्षिक 1 कोटी टन असलेले या क्षेत्रातील उत्पादन 11 कोटी टनापर्यंत जाईल. पुढील आर्थिक वर्षातच हे उत्पादन दुप्पट होईल, असे परिषदेत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)