पायाभूत चाचणी 28 ते 31 ऑगस्टदरम्यान होणार

पुणे,दि.9 – राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 28 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने ही चाचणी घेण्यात येणार असून 28 ते 31 ऑगस्टदरम्यान रोज एका विषयाचा पेपर होणार आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दरवर्षी प्रगती चाचण्या घेण्यात येतात. पहिलीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येत नाही मात्र अन्य दोन संकलित मुल्यमापनाच्या चाचण्या घेतल्या जातात. पायाभूतची चाचणी साधारणत: जुलै महिन्यात घेणे अपेक्षित असता. यंदा ही चाचणी 28 ते 31 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे.
28 ऑगस्ट रोजी पहिली ते आठवीची मराठी विषयाची चाचणी होणार आहे, 29 व 30 रोजी अनुक्रमे गणित व इंग्रजीची चाचणी होईल. तर 31 जुलै रोजी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाची चाचणी होईल. केंद्रस्तरावर पाच दिवस आधी तर शाळा स्तरावर दोन दिवस आधी या चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका देण्यात येणार आहेत.या परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी रोज किमान चार शाळांना भेटी देऊन त्यांच्याबाबतची माहिती आपल्या लॉगीनवरुन भरावयाची आहे. सर्व वर्गशिक्षकांनी साधारण अठवडाभरात पेपर तपासून महा स्टुडंट ऍपच्या सहाय्याने ऍन्ड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांने गुण अपलोड करायचे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)