पायलिंग मशीन दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा

पिंपरी – नाशिक फाटा येथील मेट्रो पायलिंग मशीन दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 6) निदर्शने करण्यात आली.

नाशिक फाटा येथे महामेट्रोचे पायलिंग मशीन शनिवारी कोसळल्याने सुमारे चार तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या घटनेस जबाबदार असणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने घटनास्थळी आंदोलन करण्यात आले. तसेच, या घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक शाम लांडे, आनंदा यादव तसेच राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यापूर्वीच मेट्रोचा पीलर निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. नियोजनाअभावी मेट्रोच्या कामामुळे शहरवासीय गेली वर्षभर वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. त्यात आता पायलिंग मशीन दुर्घटनेची भर पडली आहे. मेट्रोचा निष्काळजीपणा शहरवासीयांचे जीव धोक्‍यात घालणारा आहे. महामेट्रोने यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)