पायलट आणि गेहलोत दोघेही निवडणूक लढवणार

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली: येत्या ७ डिसेंबरला राजस्थान येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आज काँग्रेसद्वारे पक्षाचे वरिष्ठ नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. या दोन बड्या नेत्यांमधील वाद वाढत असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून मिळत होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षामध्ये अंतर्गत दुफळी माजू नये यासाठीच या दोन्ही मोठ्या नेत्यांना निवडणूक लढवण्याचा आदेश दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

याबाबत आज नवी दिल्ली येथे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करत दोघेही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)