पाबुका चक्रीवादळाचा अंदमान-निकोबार द्वीपसमूहाला धोका

नवी दिल्ली: पाबुका चक्रीवादळ अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या दिशेने सरकत असून केंद्र सरकारने धोक्‍याची सूचना, ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. अंदमान सागरात असलेले पाबुका चक्रीवादळ गेले सहा तास ताशी 20 किमी वेगाने द्वीपसमूहाच्या दिशेने सरकत आहे. रविवारी रात्री ताशी 65-75 किमी वेगाने ते अंदमान बेटाला पार म्यानमारच्या दिशेने वळण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटांना धोक्‍याची सूचना-ऑरेंज ऍलर्ट दिलेला आहे, या चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबार बेटसमूहातील कारभाऱ्यांना हवामान अत्यंत खराब होणार असून रस्ता वाहतूक आणि हवाई वाहतूकदेखील बाधित होणार आहे. एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत मच्छिमारांना 1 ते 8 जानेवारी पर्यंतमासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)