पाबळ येथील दशक्रीया घाट झाला धोकादायक

शिक्रापूर- पाबळ (ता. शिरुर) येथील दशक्रीया घाट धोकेदायक झाला असून येथे दशक्रियासाठी येणाऱ्या नागरिक आणि ग्रामस्थांना धोकादायक पद्धतीने उभे राहून अथवा बसून दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पाडावा लागत आहे. त्यामुळे या दशक्रिया घाटाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
पाबळ (ता. शिरूर) येथील दशक्रीया घाट गावा जवळीलच एका ओढ्याच्या किनाऱ्यावर असून येथे दशक्रिया विधीचे कार्यक्रम पार पाडले जातात. याच दशक्रिया घाटाशेजारीच स्मशानभूमी देखील आहे. परंतु दशक्रीया विधीसाठी बांधण्यात आलेल्या ओट्याची मोठी दुर्दशा झाली असून हा ओटा धोकादायक झाला आहे. या ओट्या खालचा भराव ओढ्याच्या पाण्याने वाहून गेला आहे. भराव वाहून गेलेला असून देखील एखाद्या दशक्रीया विधीच्या वेळेला उपस्थित असलेला मोठा जनसमुदाय या ओट्यावर बसलेला असतो. येथील दशक्रिया ओटा धोकादायक झाल्यामुळे येथे नागरिक बसल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे पाबळ हे आजोळ आहे. त्यांनी एका कार्यक्रमात येथील स्मशानभूमीसाठी निधी देण्याचे जाहीर केले होते. परंतु अद्यापपर्यंत येथे कुठले काम झालेले नाही. तर या दशक्रिया घाटाबाबत बोलताना उपसरपंच संजय चौधरी यांनी सांगितले, स्मशानभूमीसाठी निधी आल्याची माहिती आहे. परंतु हे काम कुठे अडले आहे, याची माहिती घ्यावी लागेल. निधी नसेल तर तातडीने स्मशानभूमीसाठी निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे देखील उपसरपंच संजय चौधरी यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)