पाबळ यात्रेत पोलिस बंदोबस्त

शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथे श्री भैरवनाथ देवाची यात्रा विविध कार्यक्रमांनी पार पडली. परंतु प्रत्येकवर्षी होणाऱ्या बैलगाडा शर्यती यंदाही झालेल्या नाहीत. या यात्रेत बैलगाडा शर्यत होऊ नये. यासाठी शिक्रापूर पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाडा बंदीच्या आदेशानंतरही बैलगाडा शौकीन शर्यत घेतील. म्हणून शिक्रापूर पोलिसांनी पोलीसगाड्या सकाळपासून उभ्या केल्या होत्या. त्यामुळे पर्यायाने नवसाचे गाडेही पळविण्यासाठी देखील येथील बैलगाडा शौकीन व ग्रामस्थांना अटकाव झाला. पाबळ येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा दरवर्षी माघ शुद्ध तिथीला साजरी केली जाते. यात्रेनिमित्त भैरवनाथ शर्यती भरविण्याची गेली कित्येक दिवसांची गावची परंपरा आहे. त्यातच पाबळचा घाट बैलांचा कस पाहणारा घाट म्हणून बैलगाडा शौकीनांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने घाटामध्ये बैलगाड्याला बंदी घातल्यानंतर येथे काहीजणांकडून नवसाचे म्हणून बैलगाडे पळविण्यात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. याच पार्श्वभूमिवर शिक्रापूर पोलिसांनी यात्रेच्या दिवशी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार प्रल्हाद सातपुते, ब्रम्हा पोवार यांसह आदी पोलिस फौजफाटा घाटात उभा केल्याने बैलगाडा घाटात बैलगाडा शौकीनांना फिरकतासुद्धा आले नाही. दरम्यान सकाळीच ग्रामस्थांकडून ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची पाद्यपुजा, नैवेद्य व पारंपारीक दंडवताचा कार्यक्रम संपन्न झाला.

  • बैलगाडे बंदीमुळे यात्रा ओस
    ग्रामीण भागांमध्ये यात्रेला विशेष महत्त्व असून यात्रेमध्ये बैलगाड्यांना विशेष असे आकर्षण असते. यामुळे अनेक शेतकरी यात्रेमध्ये सामील झालेले असतात. परंतु अनेक दिवसांपासून बैलगाडाबंदी असल्यामुळे सर्वत्र यात्रा तसेच लाखो रुपये खर्चून बांधलेले बैलगाडा घाट ओस पडले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)