पाबळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रोहिणी जाधव

पाबळ-शिरूर तालुक्‍यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या पाबळ ग्रामपंचायतबाबत गेले काही दिवस झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी रोहिणी सोपान जाधव यांची निवड झाली.
सरपंच मनीषा सदाशिव बगाटे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सरपंचपद रिक्त झाले होते. त्या जागी सरपंच पदासाठी गुरुवारी (31 मे) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच पदासाठी रोहिणी सोपान जाधव, पल्लवी गणेश डहाळे, शकुंतला लक्ष्मण कोल्हे यांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या वेळेत पल्लवी डहाळे यांनी माघार घेतली. निवडणुक प्रक्रियेत रोहिणी जाधव यांना 16 पैकी 11 मते मिळाली व त्यामुळे रोहिणी जाधव यांची सरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. खोल्लम यांनी जाहीर केले. यावेळी तलाठी अभिजीत जोशी, ग्रामविकास अधिकारी के. जे. रोकडे, वाय. एम. टिळेकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर खिलारे, पोलीस हवालदार संजय डावरे, हेमंत इनामे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साकोर, अर्चना जाधव, रुपाली जाधव, वैशाली चौधरी, पल्लवी डहाळे, सुलभा पिंगळे, शकुंतला कोल्हे, सारिका पानसरे, मनीषा बगाटे, संजय चौधरी, अमोल जाधव, नामदेव जगताप, संतोष जाधव, सखाराम गावडे, प्रकाश बगाटे यांसह आदी उपस्थित होते.
निवडी नंतर नवनिर्वाचित सरपंच रोहिणी जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. गावच्या विकासासाठी कटीबद्ध राहुल सर्वांना बरोबरीने घेत गावचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रोहिणी जाधव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)