पाबळमधील ठगाला बनवले उल्लू

पाबळ येथील ओंकार जंगमने फोडले भिंग : पुन्हा फोन न करण्याचा दिला सल्ला
पाबळ- आजकाल सर्वजण स्मार्ट फोन वापरत आहेत. मात्र, व्हॉटस ऍप ,फेसबुक यासारख्या सोशल मिडियात आजची तरुण पिढी अडकल्याचे आढळत आहे. त्यामुळे फसणूकीसाठी या माध्यमाचा अधिक वापर होत असल्याचे काही घटनांवरून समोर येत आहे. त्यामुळे पोलीस तसेच शासकीय पातळीवरुनही अशा बाबीं संदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असते. तरीही याकडे दुर्लंक्ष करणाऱ्या लोकांची फसवणूक होत आहे. मात्र, एक तरुण याला अपवाद निघाला. त्याने एका एटीएमचा पिन कोड विचारून गंडा घालणाऱ्याला चक्‍क चारशेवीस बनविले. आणि पुन्हा त्याला शांतपणे “मधाळ’ आवाजात हसत हसत “भाई, वापीस इधर फोन मत करना…’ असे सुनावले

सध्या संगणकीय तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे सध्या अनेक लोक टेक्‍नोसॉफिक बनल्याचे आढळत आहे. त्यामुळे त्यांना “टार्गेट’ ठेवून सुरु केलेल्या सोशल साईटस्‌, सोशल मिडिया याव्दारे गंडा घालणाऱ्यांनी आपले युक्‍त्या वापरावर भर देऊन अनेकांना चुना लावला आहे.
सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने गंडा घालणारे उत्तम हिंदीत बोलत असतात. तर “सर, साहाब’ अशी विशेषणे देत अत्यंत मधाळ आवाजात बॅंकेच्या खात्याविषयी ते सहजपणे माहिती विचारतात. तर, सर्वसामान्य व्यक्ती या बोलण्याला फसतो. आणि काही क्षणात आपल्या बॅंकेच्या एटीएमचा पीन कोड नंबर देतो. त्यामुळे ऑनलाईन पैशाची लुट केल्याचे समजल्यावर “त्या’ खातेदाराला आपण फसलो असल्याचे समजते. मात्र, पाबळ येथील ओंकार जंगम या तरुणाने मात्र अत्यंत शांतपणे, भोळ्या बोलण्यातून “त्या’ ठग्याचे पितळ उघडे केले. शिवाय प्रत्येक वाक्‍याला त्याची उत्कंठा वाढवीत त्याला फसत असल्याबाबत आंनद दिला. मात्र, त्याला एटीएमचा क्रमांक सांगतानाच त्याला योग्य पध्दतीने “गारद’ केला. की, पुन्हा तो कोणाला पिन कोड विचारणार नाही.

या प्रकरणातील संवाद :
ठग : हॅलो सर , आपका बॅंक खाता और नाम, बॅंक खातेसे बंद कर दिया है। उसे आप चालू रखेंगे या बंद करोगे?
ओंकार (भोळ्या आवाजात) : बंद कर दिया?, क्‍यो?, फिरसे चालू करना, मेरा लाख दीड लाख रुपया है। उसमें…
ठग : सर, रिन्युव्हल के कामसे बंद हो गया।
ओंकार : अरेरे…, ऐसा मत करो। मेरा लाख दीड लाख रुपया ही उसमें, रेग्युलर कर दो ना।
ठग : हा… हा.. सर, कर देंगे । हो जाएगा और आपको मॅसेज भी आएगा। तो एटीएम कार्ड है सर, आपके साथ?
ओंकार : हा… हा.. है ना।
ठग : उसे दोन मिंनट के लिये बाहर निकालिए सर,
ओंकार : हा… हा निकाला… निकाला..
ठग : अरे उसमे व्हॅलिडीटी डेट देखिये।
ओंकार : हा…हा… देखता हूॅ। लिजिए दस, ग्यारा, दो हजार अठरा…
ठग : अच्छा ठीक बताया। अभी उसके उपर सोळा अंकों का बडी बडी अक्षरोमे नंबर रहेगा। वो एटी एम नंबर बताना ।
ओंकार : हा…. हा… देखता हूँ। दिखाई नहीं देता…

अशाप्रकारे त्याला घुमवत, शाळेतील वर्गात मुले गुरुजी मागे म्हणतात. असा नंबर सांगायला सुरुवात केली, चार दोन….. त्याने पुन्हा सांगितले, फोर …टू ….जीरो, एक मिनट ठहरो, हा लिखो, फोर टू झिरो ….आगे वापीस फोर टू झिरो…., आगे वापीस फोर टू झिरो…, अच्छा आगे फिर वापीस फोर…टू …झिरो…

अशाप्रकारे चार वेळा “फोर टू झिरो’ सांगितल्यावर त्या ठगाला शिकार टप्प्यात आल्याचा आंनद आंनद झाला आणि त्या आनंदातच त्या ठगाने, मैं रिपीट कर रहा हूँ सर, बोलिये बराबर है की नही? असे म्हणाल्यावर ओंकार हो म्हणाला.
आणि त्या ठगाने वेगाने सुरुवात केली…”फोर टू झिरो, फोर टू झिरो, फोर टू झिरो’ और साला ऐसा कहां नंबर होता ही क्‍या? असे म्हणताच, त्याने शिवीगाळ केली.
यानंतर…ओंकारला हसू आवरले नाही आणि गडगडाटी हास्य करीत त्याला सुनावले, भाई वापस फोन मत करो इधर…. आणि त्याने चक्क रागाने फोन आपटला सुध्दा ….

  • लक्षात ठेवा “फोर..टू..झीरो…’
  • अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडल्याने त्यावर वर्तमानपत्रातून जागृतीही झालेली आहे. पण अशी टोळी आपला कार्यभाग सुरूच ठेवत आहे कारण अशाप्रकारचे गुन्हे आणि गुन्हेगार कधीच उघड झालेले नाहीत. यावर पोलिसांकडे जाण्यापेक्षा जनजागृती महत्वाची ठरत आहे. या उदाहरणावरून पाबळ येथील ओंकार जंगम या तरुणाने काढलेला जालीम उपाय अगदी हसत हसत सर्वांनी लक्षात ठेवला तर नागरिक फसणार नाहीत हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)