पाबळमधील ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता

  • स्वच्छ आणि स्वस्थ भारत अभियानातंर्गत राबविली मोहीम : 250 विद्यार्थ्यांचा सहभाग

शिक्रापूर – पाबळ (ता. शिरूर) येथे स्वच्छ आणि स्वस्थ भारत पंधरवडा अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सलग्न असणारे श्री पदममनी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ, सी.टी.बोरा महाविद्यालय शिरूर आणि सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पाबळ परिसरातील ऐतिहासिक स्थळांची, तसेच मस्तानी समाधी व मस्तानी गढी या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली.
पाबळ (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार सोपान जाधव, संचालक नामदेव कोहिनकर, भगवान लोखंडे, नामदेव पानसरे तसेच ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. विविध महाविद्याल्यातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी स्वागत केले. श्री पदममनी जैन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी संतोष हांडे यांनी याचे नियोजन केले. सी. टी. बोरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अभिजित चंदनशिवे, पल्लवी ताठे, सुनील पवार तसेच सीताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी स्वप्नील देशपांडे, संतोष साकोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रध्यापाकेत्तर कर्मचारी यांनी देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)