पाबळच्या सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिक्रापूर- पाबळ (ता. शिरूर) येथील भैरवनाथ विद्यालयाच्या आठवीच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य कैलास धुमाळ यांनी दिली. यश संपादित केलेल्या या विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत प्रत्येकी दरमहा एक हजार रुपये प्रमाणे एकूण 3 लाख 36 हजार रुपये शिष्यवृती मिळेल, अशी माहिती देखील प्राचार्य कैलास धुमाळ यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी सज्जाद पठाण या विद्यार्थ्यांने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला असून, पार्थ जगताप, ऋग्वेद पानसरे, अवधुत पिंगळे, अनिकेत पिंगळे, भूमिका रायकर, गौरी झोडगे यांनी देखील यश मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तुकाराम ताम्हाणे आणि प्रितम रायकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले असून, सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ संस्थेचे अध्यक्ष भगवानशेठ घोडेकर, उपाध्यक्ष ईश्वरशेठ नऱ्हे, सचिव योगेश चौधरी, खजिनदार सोपानराव जाधव आणि सर्व संचालक मंडळ, उपप्राचार्य अशोक चव्हाण, पर्यवेक्षक जी. पी. राठोड यांनी अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)