‘पानीपत’साठी पुन्हा उभारणार शनिवार वाडा

चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आगामी ‘पानीपत’ चित्रपटासाठी शनिवार वाड्याचा सेट पुन्हा उभारणार आहेत. गोवारीकर यांनी भूमी पूजन करत असतानाचा फोटो ट्‌विटवर शेअर केला आहे.

”अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या शूभ कार्याला सुरुवात केली असल्याचे फोटो कॅप्शन देऊन त्यांनी सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. शनिवार वाडा पुन्हा एकदा तेवढाच मोठा बनविला जात असल्याचेही” ते म्हणाले.’पानीपत’या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि कृति सेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)