पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपीस जामीन मिळाल्याचा निषेध

नगर – कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुरूडगाव रोड येथील पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाकपचे सहसचिव कॉ. सुभाष लांडे, ऍड. सुधीर टोकेकर, कॉ. शंकर न्यालपेल्ली, रमेश नागवडे, आसाराम सासवडे, सुरज गोरे, महादेव कानडे, रवींद्र रोकडे, अर्जुन सरगड, अर्जुन म्हस्के, सिंधू केदारे, सुरेश चेमटे, गोरख भावाले, अलका भिंगारदिवे, मंदाबाई गायकवाड आदी उपस्थित होते.

पानसरे व दाभोलकर हत्याप्रकरण महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप तपास लावून, आरोपींना अटक करणे अपेक्षित होते. मात्र, पानसरे हत्याप्रकरणातील संशयीत आरोपीस जामीन मंजूर होणे, ही धक्‍कादायक बाब आहे. याद्वारे पोलीस तपास व सरकारच्या इच्छाशक्‍ती विरुध्द प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असल्याचे सुभाष लांडे यांनी सांगितले. या प्रकरणातील गायकवाड यांचा जामीन रद्द होण्यासाठी सरकारने तातडीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)