पानसरे मळा येथे तरुणाची आत्महत्या

वाकी- चाकण येथील पानसरे मळा (ता. खेड) येथे घरातील लोखंडी बारला सुताच्या दोरीने गळफास घेऊन एका 23 वर्षीय तरुणाने आत्महतया केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने चाकण पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) रात्री उशिरा आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. बट्टू भावकर देवरे (वय 23, सध्या रा. चाकण, ता. खेड, मूळ रा. देवूर, ता. जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मेहुणा महेश वजरीबा पाटील (वय 35) फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)