पानशेत रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज.

पानशेत – पानशेत रस्त्यासह लगतच्या परिसरामध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. परिसरातील कचरा नियमितपणे उचलला न गेल्याने अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. पानशेत रस्त्यावरील काही ग्रामपंचायतींनी कचरा उचलण्यासाठी नियोजन केले नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे काही गावांतील मुख्य चौकात नागरिक कचरा टाकत असल्याने येथे कचऱ्याचे ढीग साचत आहेत. साठलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार वाऱ्याच्या वेगाने पसरण्याची शक्‍यता असल्याने या ठिकाणावरील कचऱ्याचे योग्य नियोजन करून परिसरातील साठलेला कचरा त्वरित उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खडकवासला चौपाटीवर देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. शहरात एकीकडे स्वच्छ भारत मिशन चालूअसताना दुसरीकडे नागरिक कचऱ्याच्या प्रश्‍नावर उदासीन आहेत. ढिग करत आहेत. प्रशासनाकडूनही हा कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)