पानशेत पूरग्रस्तांनो, जागा विकताना परवानगी आवश्‍यक

50 टक्के नजराणा भरण्याची अट कायम

पुणे – पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड मालकी हक्काने देण्यासाठी 1976 मधील रेडीरेकरनमधील दर ग्राह्य धरून भूखंडाची कनिश्‍चित करावी. तसेच मालकी हक्काने दिल्यानंतरही त्यांची विक्री करताना राज्य सरकारची मंजुरी आणि 50 टक्के नजराणा भरण्याची अट कायम ठेवावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे भूखंड मालकी हक्काने झाल्यानंतरही त्यांची विक्री करताना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आणि नजराणा भरणे जागा मालकांवर बंधनकारक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहरामध्ये जुलै 1961 मध्ये पानशेत धरण फुटल्यामुळे पूर आला होता. या पुरामध्ये बेघर झालेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने जमिनी संपादित करून त्यावर ले-आउट मंजूर करून सहकारी गृहनिर्माण संस्थांना 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. या जागा मालकी हक्काने मिळाव्यात, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या सोसायट्यांची मागणी आहे.

मध्यंतरी या जागा मालकी हक्काने करून देण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत सोसायट्यांना दिलेल्या भूखंडाची किंमत एक फेब्रुवारी 1976 मधील धरावी. त्यावर व्याज आकारून ते भूखंड मालकी हक्काने करून द्यावे, असे ठरले होते. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. दरम्यान महसूल मंत्र्यांसमावेत पूरग्रस्त सोसायटीधारकांची एक बैठक झाली. त्यामध्ये महसूलमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. जिल्हा प्रशासनाकडून तो नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये 1976 मध्ये रेडी-रेकनरमध्ये जो दर होता. तो दर धरून भूखंडाची किंमत निश्‍चित करावी. रिझर्व्ह बॅंकेकडून दरवर्षी जानेवारीत व्याजदर निश्‍चित करण्यात येतो. त्या व्याजदराने म्हणजे पीएलआरनुसार 1976 पासून ते आजपर्यंतपर्यंत भूखंडाच्या किंमतीवर व्याज आकरावे. तसेच जमीन मालकी हक्काने करून देताना जमिनीचा वर्ग 2 कायम ठेवावा, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.

पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना मालकी हक्काने घरे देण्यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये मालकी हक्काने घरे करून देताना जमिनीचा वर्ग दोन कायम ठेवावा. अशा घरांची विक्री करताना संबंधित भूखंड मालकांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आणि त्यावर 50 टक्के नजराणा भरण्याची अट ठेवावी, अशी शिफारस केली आहे.
– रमेश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)