पानवणमध्ये जुगारअड्ड्यावर छापा

म्हसवड, दि. 30 (प्रतिनिधी) – पानवण, ता माण गावाच्या हद्दीत वेगवेगळ्या दोन ठिकाणी सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यांवर म्हसवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे 17 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती म्हसवड पोलिसांनी दिली.
पानवण, ता. माण गावच्या हद्दीत पोलिसांच्या खबऱ्याकडून तीन पानी जुगाराचे अड्डे सुरू असल्याची खबर मिळताच म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी पानवण येथील नाथा शामराव नरळे यांच्या शेडच्या आडोशाला विहिरीजवळील उघड्या छपरामध्ये धनाजी दिनकर नरळे, कांतीलाल तुकाराम शिंदे (वय 46), मारूती पोपट तोरणे (वय 43), शंकर विठोबा काळेल (वय 48), विश्वास सदाशिव काळेल (वय 42), परशुराम लहु काळेल (वय 22), प्रकाश नवनाथ तुपे (वय 33), हे सात जण तीन पानी जुगार खेळत असल्याने म्हसवड पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकुन 1560 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले तर याच गावाच्या हद्दीत दुसऱ्या एका ठिकाणी भारत चंदर नरळे रा पानवण यांच्या घराच्या पाठीमागे आडोश्‍याला उघड्यावर नागेश गोरख नरळे (वय 26), माणिक तातोबा शिंदे (वय 56), पिंटू नरळे, पिंटू शिंदे, विठ्ठल शिंदे, व भारत नरळे सर्व रा पानवण हे तीन पानी जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकुन त्यांच्या जवळील रोख रक्कम 860 रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले असून संबधितांवर म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई ही सपोनि देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळी पोलिसांची पथके करून एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या छाप्यात पो. ना. पवार, पो. ना. कुंभार, पो. कॉ. भादुले, नदाफ, कुदळे, कवडे, जाधव, सोरटे, इंदलकर या टिमने ही कारवाई केली, अधिक तपास सपोनि देशमुख करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)