पानटपरी हलवण्याच्या वादातून एकावर वार

सातारा- पानटपरी कोणाला विचारून टाकली,असे म्हणत एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तीन युवकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.नितिन जालींदर माने, मंगेश जालींदर माने (दोघे रा. शिवराज पंपाजवळ सातारा) ओंकार कापले (रा.कापले वस्ती,गोडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत. याप्रकरणी अरबाज सलिम शेख (रा.रघुनाथपुरा,सातारा) या युवकाने तक्रार दिली आहे.

आरबाज याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नितिन,मंगेश,ओंकार यांनी तू दुकान कोणाला विचारून लावले. असे म्हणत लावलेले दुकान तात्काळ काढ.अन्यथा आमच्यासारखे कोणी वाईट नाही अशी धमकी दिली. तेव्हा तक्रारदाराने दुकान काढण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या संशयीत आरोपींनी फिर्यादीच्या हातावर कोयत्याने वार केला. याप्ररकणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे पो.ना. राजू गावीत तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)