वाकी- धंद्याच्या किरकोळ कारणावरून पानटपरी चालकाला शिवीगाळ, दमदाटी, करून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्‍याने गंभीर जखमी केल्याचा कुरुळी (ता. खेड) घडला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आज (रविवारी) हॉटेल मालकासह त्याचा कामगार अशा दोघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल जयमल्हारचा मालक अण्णासाहेब व हॉटेल मधील कामगार (दोघांची नावे, गाव, पूर्ण निष्पन्न नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रभाकर हरिभाऊ नकलवार (वय 35, सध्या रा. चाकण. मूळ रा. किल्ले धारूर, ता. धारूर, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद भोसले पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)