पानटपरीची तोडफोड करत चालकास मारहाण

प्रभात वृत्तसेवा

पुणे – सिगारेट देण्यास नकार दिल्याने पानटपरी चालकास मारहाण करून टपरीची तोडफोड करण्यात आली. तसेच, रोकड लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार डायसप्लॉट गुलटेकडी परिसरात शनिवारी रात्री घडला. याप्रकरणी जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
गोविंदसिंग टाक (19), प्रशांत सोनवणे (19) आणि शिवप्रसाद धेंडे (24, तिघेही रा. वारजे माळवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ददन कुमार पूजन (रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजन यांची डायसप्लॉट परिसरात पानटपरी आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी टाक आणि इतर दोघे त्यांच्या टपरीवर आले. त्यांनी सिगारेट मागितली. त्यावर फिर्यादींनी “तुम्ही अगोदर पैसे द्या’ अशी विनंती केली. त्यावरून “तु आम्हाला पैसे मागतोस का?’ असे म्हणत आरोपींनी पूजन यांना मारहाण करीत टपरीची तोडफोड केली. तसेच, गल्ल्यामध्ये जमा झालेली पाचशे रुपयांची रक्‍कम काढून घेतली. “यापुढे वेळेवर हप्ता दिला नाही तर तुला जीवे मारू’ असे धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तोडफोड करून खंडणी मागितल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)