पिंपरी  – काळभोर चौकातील जुन्या बस स्थानकाजवळ एका पादचाऱ्यास ट्रकने चिरडले आहे. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.

सागर नेताजी शिंदे (वय-22, रा.पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ट्रक चालक गजेंद्र चंद्रभान उगलमुगले (रा. मामुर्डी, देहुरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर चौक येथे फिर्यादीचा भाऊ रामदास नेताजी शिंदे (वय-30, रा. मामुर्डी, देहुरोड) हे रस्ता ओलांडत असताना ट्रक (एमएच 12, केपी 9998) या ट्रकने जोरात धडक दिली. यावेळी शिंदे हे ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उगलमुगले याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)