पादचाऱ्यांच्या हितासाठी “स्ट्रिट डेव्हलपमेंट’

पिंपरी – नेहमी वर्दळीच्या रस्त्यावरुन जाताना पादचारी नागरिकांना अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाताचा सामना करावा लागतो. काहीवेळा पादचाऱ्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो, अशी टीका प्रशासनावर होत असते. मात्र, त्यावर प्रभावी तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने आता पादचाऱ्यांना सोयीस्कर असा “स्ट्रिट डेव्हलपमेंट’ प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक 15 आणि 16 ची निवड केली आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशन येथून विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तळेगाव, देहुरोड, लोणावळा, पुणे आदी ठिकाणी ये-जा करीत असतात. या परिसरात महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये व वसाहतींमधील नागरिकांची मोठी रहदारी असते. या रस्त्यावरील वाहनांचा विचार करता पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरुन चालताना अपघाताचा समाना करावा लागतो. तसेच, पदपथावरील दुकाने व हातगाड्या यामुळे पादचाऱ्यांच्या हक्‍काचा पदपथ वापरास मिळत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने “पीसीएमसी नेबरहूड स्ट्रिट डेव्हलपमेंट’ हा प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पात नागरीकांचा सहभाग वाढवण्यासठी आकुर्डी येथील चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, तसेच प्रभाग क्रमांक 16 मधील नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, संगिता भोंडवे, महापलिकेतील अधिकारी राजन पाटील, प्रमोद ओंभासे, संजय साळी, सुनील पवार आदी उपस्थित होते.
प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणारे हे काम मे. पेव्हटेक कन्सल्टंट या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी मे. विकास ठाकर यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली असून, अर्बन प्लॅनर प्रसन्ना देसाई काम पाहणार आहेत.

…या रस्त्यांवर होणार विकास
– आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर – (1 किमी.)
– आकुर्डी रेल्वे स्टेशन ते निसर्ग दर्शन सोसायटी – (1 किमी.)
– आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बिजलीनगर रेल्वे उड्डाणपूल – (700 मी.)
– आकुर्डी रेल्वे स्टेशन ते बास्केट ब्रीज रावेत – (2.5 किमी.)

…असे असतील विकसित रस्ते
– सायकल ट्रॅक आणि हरित दुभाजक
– सिटिंग ऍरेंजमेंट (बैठक व्यवस्था)
– पार्किंग व्यवस्था
– रुंदीकरण केलेले फूटपाथ
– गतिरोधक
– शोभिवंत स्थळ
– सार्वजनिक सायकल व्यवस्था.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)