पादचारी व्यक्तीला लुटणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

पुणे – पादचारी व्यक्तीकडील 30 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि रोख 1900 रुपयांची जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सोहेल शकील सय्यद (वय 21), साजीद अब्दुल शकुर सय्यद (वय 24), वसीम रफिक शेख (वय 25) आणि सनी कुमार भोसले (वय 20, सर्वजण, रा. शिरूर, जि. पुणे) अशी पोलीस कोठडी झालेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत नरेंद्र मधुकर जावळे (वय 29, रा. नवी मुंबई) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 17 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता शंकरशेठ रस्त्यावर घडली. जावळे हा सेव्हन लव्हज चौकाकडून स्वारगेटकडे पायी चालला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जावळे यांच्याकडील दोन मोबाईल, रोख 1900 हजार रुपये लांबविले होते. पोलिसांनी तपास केला असता चौघांनी हा गुन्हा केला असल्याचे उघड झाले. पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि रोख 1900 रुपये हस्तगत करण्यासाठी, त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत का, त्यांनी अशा प्रकारचे आणखीन गुने केले आहेत का, याच्या शोधासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)