पादचारी महिलेची पर्स लंपास

निगडी – रस्त्याने पायी घरी निघालेल्या एका महिलेची पर्स मागून दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी चारच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील हॉटेल सुखशांतीसमोर घडली.

साधना संजय दातार (वय-52, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधना प्राधिकरण मधील सुखशांती हॉटेल समोरील रस्त्यावरून पायी जात होत्या. यावेळी अचानक मागून दुचाकीवरुन आलेल्या एका चोरट्याने साधना यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेली. पर्समध्ये रोख रुपये आणि मोबाईल फोन असा एकूण 23 हजारांचा ऐवज होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)