पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा

पिंपरी – महात्मा बसवेश्वर चौकामध्ये पादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

मोहननगर प्रभाग क्रमांक चौदामधील चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्ता बीआरटीकडे आहे. त्यात महात्मा बसवेश्वर चौक आहे. या चौकांमधून मोहननगरकडून मोरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन शाळा आहेत. त्यामध्ये गोयल माध्यमिक विद्यालय, गीतामाता हायस्कूल आणि आयबीएमआर कॉलेज आहे. या शाळेचे सर्व विद्यार्थी मोहननगर परिसरातील आहेत. शाळा सुटण्याची आणि भरण्याची वेळी या चौकामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. केएसबी चौकाकडून येणारी वाहने एमआयडीसीतून येतात आणि ती मोठी असतात. त्यामुळे या चौकात अपघात होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक चौदामधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी पादचारी पूल उभारणे गरजेचे आहे. चिंचवड स्टेशन चौकापासून ते मोरवाडी महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत आपल्या बीआरटीच्या रस्त्यावर बेशिस्त वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उर्वरीत रस्त्यावर लवकरात लवकर दुभाजक बसविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे. महापालिका बीआरटी विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)