पाथर्डी-शेवगावच्या विकासासाठी ढाकणेंचा संघर्ष

प्रांताधिकारी बांदल यांचे मत; “केदारेश्‍वर’ च्या मिल रोलरचे पूजन
शेवगाव  – शेवगाव-पाथर्डीसारख्या दुष्काळी भागाच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी अत्यंत खडतर संघर्ष केला. अर्थिक काटकसरीने बोधेगाव परिसरात ऊसतोडणी कामगारांच्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी व्यक्त केले.
बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामासाठी आणलेल्या नवीन मिल रोलरचे पूजन डॉ. बांदल, पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील, रेणुकामाता संस्थेचे संस्थापक प्रशांत भालेराव, करसल्लागार किरण भंडारी, कार्यकारी व्यवस्थापक भाऊसाहेब बर्डे यांच्या करण्यात आले.
या वेळी केदारेश्वरचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे म्हणाले, “”परिसरात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने ऑक्‍टोबरपासून चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. पाच लाख टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे.”
उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, भाजप किसान आघाडीचे जिल्हध्यक्ष तुषार वैद्य, माधव काटे, संचालक सुरेशचंद्र होळकर, सतीश गव्हाणे, बाळासाहेब सिरसाट, सीताराम बोरुडे, बंडू बोरुडे, अमोल बडे, बाळासाहेब फुंदे, त्रिंबक चेमटे, रणजीत घुगे, तीर्थराज घुंगरड, पोपट केदार यांच्यासह कामगार पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी आभार मानले.

इथेनॉलनिर्मिती करणार

-Ads-

केदारेश्वर साखर कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी इथेनॉल प्रकल्प हाती घेण्याची घोषणा करून ऊस गाळपासाठी संचालक, ऊसउत्पादक शेतकरी व कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रताप ढाकणे यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)