पाथर्डीसाठी बुधवार ठरला आंदोलनवार ; बहुजन क्रांती पक्षाचा ठिय्या…

पाथर्डी – दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला शासनाने तत्काळ मदत करावी, शेतकऱ्यांच्या दावणीला चारा-पाण्याची व्यवस्था करावी, शिधा पत्रिकेमधील संगणकीय त्रुटी दुरुस्त कराव्यात, निराधार, वृद्ध, अपंगांचे रखडलेले अनुदान वितरित व्हावे, कलाकारांना तत्काळ मानधन मिळावे, पाथर्डी तालुका कृषी कार्यालय तातडीने नवीन इमारतीत हलवावे आदी मागण्यांसाठी बहुजन क्रांती पक्षाच्यावतीने पाथर्डी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांसमोर बोलताना बहुजन क्रांती पक्षाचे अध्यक्ष ऍड. सतिष पालवे म्हणाले, दुष्काळ जाहीर करून महिना उलटला तरीही शासनाकडून अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतात राबणाऱ्या बहुजन समाजाला उध्वस्त करून देश महासत्ता होणार नाही. सातपदरी हायवे, बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प, नवीन विमानतळ या विकासकामापेक्षा शेतकऱ्यांचे जगणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी शेतीमालाला हमीभाव मिळायला हवा. शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही. नोकरवर्गाला सातवा वेतन आयोग द्यायला सरकारकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन घोषणा झाली मात्र शेतीमालाला हमीभाव देण्याचा विचारसुद्धा केला नाही. गोरगरीब विधवा, निराधार, अपंग यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले त्यांचे रखडलेले प्रस्ताव त्वरित पूर्ण करा. शेतकरी बांधवाच्या कुटूंबाचा कणा असलेला दूध व्यवसाय वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या दावणीला चारा-पाण्याची व्यवस्था करा, शिधापत्रिका संगणकीय करताना त्यामध्ये दोष निर्माण झाल्याने ऐन दुष्काळात जनतेला अन्नधान्य मिळत नाही.

गावोगावी असलेली भजनी मंडळ, बॅंड पथकातील कलाकार, पोतराज, वासुदेव,गोसावी, डोंबारी, जागरण गोंधळ इत्यादी पारंपरिक कलाकारांना मानधन सुरू करा. पाथर्डी तालुका कृषी कार्यालय शहरापासून दूर असल्याने शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा प्रजासत्ताक दिन साजरा होऊ देणार नाही असा इशारा यावेळी पालवे यांनी दिला. नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर मदत करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात वजीर शेख, शशिकांत नवगिरे, सुधाकर शेरकर, सागर गावडे, गणेश गोरे, भगवान घुगे, संभाजी पालवे, सुधाकर कारखेले, इम्रान पठाण, संदीप सातपुते, विकास पालवे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)