पाथर्डीसाठी बुधवार ठरला आंदोलनवार ; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा

पाथर्डी – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी सह अन्य आर्थिक लाभ मिळावेत, या मागणीसाठी तालुक्‍यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील वसंतराव नाईक चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. ग्रामपंचायत कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा देत मोर्चा तहसील कचेरीत पोहोचला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणीसह अन्य आर्थिक लाभ मिळावेत, जोपर्यंत वेतनश्रेणी लागू होत नाही, तोपर्यंत नवीन सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे, नवनिर्मित नगरपंचायतींसाठी जो लोकसंख्येचा आकृतिबंध जाहीर करण्यात आलेला आहे.

त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ही तो लागू करावा, सध्या कार्यरत कोणत्याही कर्मचाऱ्यांना अनुदान बाह्य ठेवण्यात येऊ नये, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या. निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्‍वासन दिले. मोर्चात ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे, कॉ. मारोती सावंत, दीपक मोरे, रामदास साळवे, सिकंदर पठाण, लहू खुडे, राजू राठोड, विकास आंधळे, संदीप काळे, पंढरी चव्हाण, गोरक्ष पातके, भानुदास घोरपडे, राजू पेटारे, नवनाथ गिरी सहभागी झाले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)