पाथर्डीत विस्थापित अतिक्रमणधारकांचे धरणे आंदोलन

पाथर्डी: शहरातील स्टेट बॅंकेसमोरील विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज ( दि.27) धरणे आंदोलन करीत आम्ही पालिकेला कर भरत असून आमचे अतिक्रमण हटविण्यात येऊ नये अशी मागणी केली.

शहरातील जुने बसस्थानकातील स्टेट बॅंकेसमोर असणाऱ्या व्यावसायिक टपरीधारकांना हटविण्यात आले होते, याच्या निषेधार्थ येथील व्यावसायिक टपरी धारकांनी आज तेथील जागेवर धरणे आंदोलन करीत आहे त्या जागेवर बसू देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनात सोमनाथ लोटके, गहिनीनाथ वारे,शेषराव आठरे, शिवाजी घुले, बाबू फुलमाळी, सदाशिव केदार, पोपट केदार, सुनील मर्दाने, रामचंद्र सानप, आदिनाथ पवार, सदाशिव केदार, रहेमान शहा, नवनाथ वारे, सुधाकर शिरसाट, महादेव शिरसाट,प्रमोद कुटे, अनिल पंडित आदी टपरीधारक आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जुन्या बसस्थानकाला लागून नगररोडला लागून गेल्या पंचवीस वर्षापासून छोटे व्यवसाय करून उपजीविका चालवत असून टपरी धारक जाणकाबाई खटावकर यांच्या पाच गुंठ्याच्या जागेवर बसलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बसस्थानकाची जागा 46 गुंठे असतानी चुकीच्या पद्धतीने 51 गुंठ्याचा उतारा तयार करून टपरीधारकांचे अतिक्रमण दाखवण्यात आलेल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. पालिकेने भोगवटादार म्हणून उतारे दिल्याने टपरीधारकांनी वीज कंपनीकडून वीज जोडण्या घेतले असून 22 टपरी धारक पालिकेला कर भरत आहेत, अशी परिस्थिती असताना प्रशासन पूर्व सूचना न देता अतिक्रमणे काढत असून काही टपरी धारकांनी न्यायालयात प्रकरणे दाखल केली असून ते न्यायप्रविष्ठ आहेत त्यामुळे या ठिकाणच्या टपऱ्या हटवू नये, या मागणीसाठी टपरीधारकांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांना त्यांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे सादर केल्या नंतर पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)