7 ग्रामपंचायतींसाठी 76 उमेदवारांचे अर्ज शिल्लक

चिचोंडीच्या सरपंचपदी कलाबाई हाटकर बिनविरोध
डोंगरवाडीचे 4, गितेवाडीचा 1 सदस्य बिनविरोध

पाथडी – तालुक्‍यातील 7 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी 12, तर सदस्यांसाठी एकूण 76 उमेदवार रिंगणात राहिले.

तालुक्‍याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या चिचोंडीच्या सरपंचपदी कलाबाई साहेबराव हाटकर यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्‍यातील पाडळी, ढवळेवाडी, चिचोंडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, गितेवाडी, धारवाडी ग्रामपंचायतची निवडणूक 27 मे रोजी होत आहेत.
पाडळी, चिचोंडी, ढवळेवाडी या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जातात. थेट जनतेतून सरपंच निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने या गावांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

ऐन उन्हाळ्यात राजकीय हवा तापल्याने गावे निवडणूकमय झाली आहेत. डोंगरवाडीचे 4 सदस्य बिनविरोध झाले. गितेवाडी 1 सदस्य, धारवाडी 1 सदस्य बिनविरोध निवडून आला. पाडळी ग्रामपंचायत वृद्धेश्‍वर कारखाना प्रभाव क्षेत्रात येते. बहुसंख्य ग्रामपंचायतींवर सध्या आमदार मोनिका राजळे व आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व आहे. उमेदवारांची धावपळ वाढून आमदारकीच्या थाटात सरपंचपदाची निवडणूक होत आहे. कार्यकर्ते सांभाळून मतदारांशी मनधरणी करायचे काम उमेदवाराला जड वाटू लागले आहे. आश्‍वासनांची खैरात यापेक्षा ढाब्यावर खर्च किती यावर गणिते ठरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)