पाथर्डीच्या स्मशानभूमीत दोन स्नानगृहे; अभय आव्हाड प्रतिष्ठानचा उपक्रम 

पाथर्डी – स्मशानभूमीच्या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या महिलांची स्नान करताना होणारी कुचंबणा थांबवण्यासाठी अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील कोरडगाव रोडलगतच्या स्मशानभूमीत दोन स्नानगृहांची उभारणी करण्यात आली आहे. अभय आव्हाड प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.
अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानने पाथर्डी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे निरंतर व्रत हाती घेतले आहे. आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. स्मशानभूमीत नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांना उघड्यावर स्नान करताना मोठी कुचंबणा सहन करावी लागत होती. दुःखाच्या ठिकाणीही महिलांना पुरुषांच्या किळसवाण्या नजरेला सामोरे जावे लागत होते. हा सामाजिक प्रश्‍न लक्षात घेऊन लोकांच्या मागणीनुसार अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कोरडगावलगतच्या स्मशानभूमीत दोन स्नानगृहांची उभारणी करून महिलांप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम कृतीतून दाखवले आहे.
स्नानगृहाच्या उभारणीवेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बबन चौरे, शशिकांत काळोखे, दादासाहेब वाघ, संजय बडे, संतोष गायकवाड, अभिजीत खेडकर, प्रमोद हंडाळ, योगेश विधाटे, नवनाथ पालवे व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)