पाथर्डीची ओळख पाणीदार तालुका म्हणून व्हावी

आमदार मोनिका राजळे : हंडाळवाडी येथे पाझर तलावाच्या कामाचा शुभारंभ
पाथर्डी – दुष्काळी पाथर्डी तालुक्‍याची ओळख या वर्षीपासून बदलून पाणीदार तालुका अशी नवी ओळख व्हावी, एवढी कामे जलयुक्त शिवार योजना, वॉटर कप स्पर्धा ,अनुलोम संस्था, जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटनाच्या माध्यमातून तालुक्‍यात झाली आहे. असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.
हंडाळवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेतून पाझर तलाव बळकटीकरण कामाचा शुभारंभ आ. राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समीतीच्या सभापती चंद्रकला खेडकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, जेष्ठ नेते हिंदकुमार औटी, मधुकर काटे, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, अनिल बोरूडे, बबन बुचकुल, नगरसेविका सुरेखा गोरे, मंगल कोकाटे, सविता भापकर, पुष्पा हंडाळ, खरेदी विक्री संघाच्या संचालिका भिमाबाई जेधे, पंचायत समिती सदस्य सुनिल ओव्हळ, माजी जि.प. सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, वसंत पवार, जमीर आतार, पांडुरंग हंडाळ, जगदीश काळे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आ. राजळे म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारने गेल्या चार वर्षात जलसंधारणाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करून विविध योजना अंमलात आणल्या. यावर्षी पावसाला चांगली सुरूवात झाली असुन हवामान खात्याने भरपुर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मागील हंगामात कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे काम सुरू आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतपरी सहकार्य केले जात आहे. पाथर्डी -शेवगाव मतदार संघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विकास निधी देताना झुकते माप दिल्याने कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली.आगामी काळातही जलसंधारणाच्या कामासह इतर अनेक प्रस्तावीत कामांना निधी उपलब्ध होणार आहे.
शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत. गेल्या अनेक वर्षाचा विकासाचा अनुशेष गेल्या चार वर्षात बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाला आहे. हंडाळवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर सभामंडपाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ कोकरे तर आभार नगरसेविका शारदा हंडाळ यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)