पात्र असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही – सुभाष देशमुख

सोलापूर – कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफी मिळणार आहे. कोणत्याही कारणास्तव कर्जमाफीचा अर्ज न  भरू शकलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधकांकडे अर्ज द्यावा, असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. कर्जमाफीसाठी पात्र असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यात अजूनही शेकडो शेतकऱ्यांना तांत्रिक कारणास्तव कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यांच्याबाबत शासन नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.दरम्यान एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार  नसल्याचं सुभाष देशमुख यांनी म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)