पात्र, अपात्र झोपडपट्टीधारकांचे होणार सर्वेक्षण

पाटील इस्टेट झोपडपट्टी आग : मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठवणार


जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे – दांडेकर पूल येथील कालवा फुटीत बाधित कुटुंबांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या धर्तीवर पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर या झोपडपट्टीतील पात्र आणि अपात्र धारकांचे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करण्याचे यावेळी ठरले आहे.

मागील महिन्यात दि.28 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे 90 झोपड्या जळून खाक झाल्या. या जळीतग्रस्तांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमहापौरांनी केली होती. परंतु, राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार अत्यल्प मदत करता येते. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार?
दांडेकर पूल येथील कालवा फुटीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना विशेष आर्थिक मदत देण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर पाटील इस्टेट येथील जळीतग्रस्तांना शासनाच्या अध्यादेशानुसार मदत करावयाची झाली, तर ती अत्यल्प होते. झोपडी बांधण्यासाठी किमान पन्नास हजार रुपयांची मदतीची आवश्‍यकता आहे. हे विचारात घेऊन विशेष बाब म्हणून जळीतग्रस्तांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदतीचे वाटप करण्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी, असे या बैठकीत ठरले. दरम्यान, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना भविष्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या निमित्ताने प्राधिकरणाने या झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून पात्र आणि अपात्र झोपडीधारकांची यादी तयार करावी, असेही या बैठकीत ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)