पाण्यासाठी शेतकरी पाटबंधारेच्या उंबऱ्यावर

शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे निवेदन

बावडा- सध्याची शेतकऱ्यांची व शेतीची गरज पाहता तातडीने निरा डाव्या कालव्यातून पाणी सोड्यात यावे. नीरा डावा कालव्याच्या 59 फाट्यातून पाणी सोडावे, अशी मागणी शेटफळ तलाव बचाव कृती समिती व लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असून पाण्याकरिता शेतकरी पाटबंधारे खात्याचे उंबरे झिझवू लागला आहे. पाणी मिळाले नाही तर उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच इंदापूर तहसिलदार, इंदापूर पोलिस स्टेशन आदींना सदर निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हंटले आहे की, पाणी पुरवठ्याबाबतच्या मागण्यांची अंमलबजावणी येत्या दि.2 नोव्हेंबर पर्यंत न झाल्यास दि.3 नोव्हेंबर पासून जलसंपदा खात्याच्या वकिलवस्ती येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असा इशाराही देण्यात आला आहे.
या तलावाच्या लाभक्षेत्रात यापूर्वी मे महिन्यात आवर्तन सोडण्यात आले होते.त्यानंतर आजअखेर आवर्तन देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाण्याअभावी लाभक्षेत्रातील बावडा, भोडणी, वकिलवस्ती, सराटी, निरनिमगाव, कचरवाडी, शेटफळ, पिठेवाडी, लाखेवाडी गावातील उभी पिके तसेच चारा पिके सध्या जळून चालली आहेत. लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही भेडसावत आहे.
भाटघर धरण हे पूर्ण क्षमतेने दोन-तीन वेळा भरलेले असताना देखिल मागणी करूनही शेटफळ तलावात जलसंपदाकडून पाणी सोडण्यात आलेले नाही. निरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर येऊन पाणी वाहून वाया गेले. महाराष्ट्र शासनाच्या 2005च्या पाणी वाटप धोरणानुसार टेल टू हेड पर्यंत सर्वांना सारखे पाणी वाटप होणे आवश्‍यक असताना व भाटघर-वीर धरणांमध्ये जेवढे टक्के पाणी साठविले आहे त्याच टक्केवारीत शेटफळ तलावात पाणी सोडण्याची तरतूद असतानाही शेटफळ तलावात जलसंपदा विभागाने पाणी सोडलेल नाही, असा आरोपही शेतकरीयांनी निवेदनात केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)