पाण्यासाठी महापौर बंगल्यावर धडक

पुन्हा आंदोलन : पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन


 महापौर स्वत: जाऊन करणार तपासणी

पुणे – मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनीसह शिवाजीनगर पोलीस वसाहत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने तसेच एका तासापेक्षाही कमी पाणी येत आहे. जलवाहिनीचा व्हॉल्व नादुरूस्त झाल्याने शनिवारपासून या भागात पाणीच नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी रविवारी थेट महापौर बंगला गाठत बादल्या आणि हांडे घेऊन पाण्यासाठी आंदोलन केले.

कालवा समिती बैठकीत शहराच्या पाणीकपातीचा निर्णय झाला. त्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून जवळपास संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. मुख्यसभेतही त्याचे पडसाद उमटले. पण, त्यात अजूनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शिवाजीनगर येथील रेव्हेन्यू कॉलनीतील महिलांनी रविवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यावर धडक मोर्चा काढला. त्यात शंभराहून अधिक महिलांसह पुरुष मंडळी मुलांसह सहभागी झाले. या सर्वांनी महापौरांच्या दारातच ठिय्या मांडला आणि “पाणी द्या पाणी’ अशा घोषणा दिल्या

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी महापौरांनी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची बैठक बोलाविली होती. यानंतर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर या महिलांनी आंदोलन मागे घेतले.

महापौरांनी केली पाहणी
गेल्या आठवडाभरापासून शिवाजीनगरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत नियमित पुरवठा करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनास दिलेल्या असताना मागील दोन दिवसांपासून पुन्हा कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास महापौरांनी रेव्हेन्यू कॉलनीत जाऊन पाणी कशा प्रकारे दिले जाते, याची पाहणी केली.

लष्कर जलकेंद्रातील पाण्याच्या तुटवड्यामुळे शहरात पाणी नियोजन ढासळल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाने कपात दोन दिवस आधीच सुरूकेल्याने सुरूवातीला दोन दिवस समस्या आल्या. उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले आहे. या भागात रविवारी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत तातडीने पाणी पुरवठ्याच्या सूचना दिल्या आहेत.
– मुक्ता टिळक, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)