पाण्यासाठी निमसाखरच्या शेतकऱ्यांचे घसे कोरडे

पाटबंधारेला विनवण्या; पीके जळाल्यास नुकसान भरपाईची मागणी

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर) व परिसरात अल्प पावसात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील केलेली धूळपेर आणि त्यानंतर झालेल्या भुरभुर पावसावर पिके डोलू लागली होती. मात्र, उभ्या पिकांना पाण्याची गरज भासत असताना पाटबंधारे खात्याला विनवण्या करून शेतकऱ्यांचे घसे कोरडे पडले आहेत. हातची पिके वाया जाण्यास पाटबंधारे विभागच जबाबदार असून याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी लागेल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, दगडवाडी, घोरपडवाडी यासह अन्य भागात अल्प पाऊस झाला आहे. पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने अल्प ओलिवर तर काही ठिकाणी पाणी उपलब्धतेनुसार आणि काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धूळपेरीवरच पेरणी केली. त्यानंतर अधून मधून रिमझिम पाऊस तर पाटबंधारे खात्याच्या मध्यंतरी दिलेल्या आवर्तनामुळे काही प्रमाणात पिके डोलू लागली होती. सध्या, पहाटे हवेत गारवा तर दुपारी कडक उष्णता तसेच अधून मधून जोरदार वारे, असे वातावरण असल्याने याचा पीकांवर परिणाम होवू लागला आहे. त्यातच जलसंपदा खात्याच्या नियोजनाच्या अभावा फटका बसत असून पाण्याची गरज असताना पाटबंधारे खात्याकडून आवर्तने बंद करण्यात आली आहेत.
उभ्या पिकांना प्राधान्य देत तातडीने पाणी कसे देता येईल, याचे नियोजन पाटबंधारे खात्याने करणे गरजेचे आहे. याचबरोबर अनेक गाव पातळीवर असणारे जलस्त्रोत आटले असून पिण्याच्या पाण्याची तळी पाटबंधारे खात्याने भरणे जरुरीचे आहे. पाणीटंचाई जाणवण्यापूर्वीच पाटबंधारे खात्याने हे नियोजन करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • रब्बीचे पहिले अवर्तन सुरु असुन येत्या काही दिवसात हे आवर्तन संपेल. त्यानंतर दुसरे आवर्तनाकरिताही शेतीकरिता पाणी सोडण्याचे प्रयत्न आहेत. या आवर्तनावेळी पहिल्यांदा पिण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
    – लक्ष्मण सुदरीक, शाखा अभियंता, जलसंपदा विभाग

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)