पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येतातच कशा?

पिंपरी – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना तसेच पुरेसे पाणी धरणातून उचलले जात असतानाही भोसरीतील काही भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. अधिकारी व नगरसेवक असताना नागरिकांच्या तक्रारी येतातच कशा? यापुढे तक्रारी येता कामा नये. अधिकारी वेळेत उपस्थित नसतील, तर नगरसेवकांनी लोकांपर्यंत पोहचून तक्रारी तात्काळ सोडवल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार महेश लांडगे यांनी अधिकारी व नगरसेवकांना बजावले आहे.

भोसरी परिसरातील पाणीपुरवठ्या संदर्भात आमदार लांडगे यांनी मंगळवारी “ई’ क्षेत्रीय कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, वॉलमन आणि नगरसेवक यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला “ई’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, “फ’ कार्यालयाच्या अध्यक्षा कमल घोलप, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेवक नितीन लांडगे, संतोष लोंढे, राहुल जाधव, सागर गवळी, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, निर्मला गायकवाड, सारिका लांडगे, यशोदा बोईनवड, सोनाली गव्हाणे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, सागर हिंगणे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सचिन तापकीर, नितीन बोराटे, पाणीपुरवठा अधिकारी एस. ए. तुपसाखरे, व्ही. बी. शिंदे, वि. भी. कांबळे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवडकारांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. भोसरी परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वॉलमन, अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाणीपुरवठा कमी दाबाने का होत आहे? याची पाहणी करावी. काय समस्या असेल, तर ती त्वरित सोडवावी. महापालिकेच्या पाईपलाइन, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्‍यांजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. काही प्रभागात सकाळी सहा ते नऊ या वेळेत तर काही भागात संध्याकाळी सहा ते नऊ यावेळेत पाणी सोडावे आणि पाणी जपून वापरा, पाण्यासंदर्भात तक्रारी येता कामा नये. तसेच, दूषित पाणी पुरवठा होऊ नये. पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या टाक्‍या साफ करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांबरोबर प्रत्येक वॉर्डात पाणी आले की नाही? याची जबाबदारी नगरसेवकांनी घ्यावी. दूषित, ड्रेनेज मिश्रीत पाणी पुरवठा होता कामा नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा आशा कडक सूचना लांडगे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येता कामा नयेत याची दक्षता घेण्याची गरज आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)