पाण्यासाठी दाही दिशा – 4 मैलांवरून पोहत पाणी आणणारी महिला

नवी दिल्ली – पाणी ही मनुष्यासाठी अत्यावश्‍यक गोष्ट आहे. तरीही जगातील सुमारे 100 कोटी माणसांना पिण्याचे शुद्ध पाणे मिळत नाही. सन 2015 पर्यंत जगातील 50 टक्के लोकसंख्येला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागेल असा अंदाज केला जात आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशियाच्या एका महिलेने एक आदर्श घालून दिला आहे. ही पहिला पिण्याचे पाणी आणण्यसाठी दररोज चार किलोमीटर्स पोहत जाते.

मिळालेल्या माहितीनुसार मामा हासरिया (46) नावाची ही महिला इंडोनेशियातील सुलावेसी नावाच्या एका छोट्याशा बेटावर राहते. त्या बेटावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आपल्या समाजाच्या माणसांसाठी हासरिया कमरेला सुमारे 200 कॅन बांधून नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील विहिरीकडे जाते, आणि कॅन्समध्ये पिण्याचे पाणी भरून आणते. तिला साधारणपणे एक तास पोहावे लागते. हासरियाप्रमाणे तेथील इतर महिलांनाही पिण्याच्या पाण्यासाठी अशीच कसरत करावी लागते. प्रत्येक कॅनसाठी तिला अडीच रुपये मिळतात. इंडोनेशियात अनेक ठिकाणी पाण्यासाठी अशीच धावपळ करावी लागते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)