पाण्याच्या योग्य नियोजनामुळे उन्हाळी बाजरी जोमात

निमसाखर- ऐन उन्हाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करीत कळंब गावातील एका शेतकऱ्याने उन्हाळी बाजरीचे पीक घेतले असून बाजरीचे पीक जोमदार आल्यामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीचे कौतुक होत आहे. कळंब गावातील शेतकरी अनंता गणपत गायकवाड यांनी आपल्या शेतीमध्ये पाण्याचा आराखडा आखत एक एकर बाजरीचे पीक घेतले असून सध्या तीन पाळ्या पाणी दिले असून अजून एक पाणी दिल्यास बाजरी काढायला येईल. सध्या बाजरीचा दर प्रतिक्विंटल 1800 ते 2200 रुपये असून एकरामध्ये अंदाजे 18 ते 20 क्विंटल बाजरी होईल असे गायकवाड यांनी सांगितले. एकीकडे पाण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागत आहेत. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेफिकिर वृत्तीमुळे शेतीमधील पिके जळून जाण्याच्या मार्गावर असताना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करीत हिरव्यागार बाजरीच्या पिकांचे उत्कृष्ट पीक घेतले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)